नंदुरबार l प्रतिनिधी
उमर्दे खु ता. नंदुरबार येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सागर साळुंखे ग्रामपंचायत सदस्य कैलास वळवी माजी सरपंच अरविंद वळवी, रमेश कुटे, गोविंद पायमोडे, रामभाऊ बेंद्रे, कृष्णा बोराणे , ग्रामसेवक भरत गुले सह गावातील पदाधिकारी व प्रतिष्ठित ग्रामस्थ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमर्दे खुर्द येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना व ठक्कर बाप्पा योजना यांच्या संयुक्त अभिसरणातून गावातील अंतर्गत रस्ता सांडपाणी नियोजनाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते . यात संपूर्ण गावातील व आदिवासी वस्तीतील गावांतर्गत १४५ व १५५ मीटरचे सात रस्ते सांडपाण्यासाठी सातशे मीटर आठ इंची, दहा के.जी.चे पि. व्ही.सी. पाईप, चार फुटी रुंदीची गटार, काँक्रिटीकरण झालेला रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे आदी कामे केली जाणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे .
यात वडवद येथील उमर्दे गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे रुंदीकरण, विहीर ते उमर्दे गावापर्यंत दोन किलोमीटर जलवाहिनी, ८५ हजार लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी गावाच्या चारी बाजूस गुरांसाठी पाण्याचा हाळ ,तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीस लाख रुपये. काँक्रिटीकरण आधी झालेल्या कामामुळे गावाचे स्वरूप पालटले आहे.
सांडपाण्यासाठी नियोजन बध्द सुरू असल्याने गावातील सांडपाण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. तसेच गावात पाणीपुरवठा करणारे विहिरीची रुंदीकरण व नवीन जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल ह, या सर्व कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.








