नंदुरबार l प्रतिनिधी
मतिमंद बालिकेवर सामुहिक बलात्कार करणा-या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शहादा पोलीस ठाणे हद्दीतील राहणा-या फिर्यादी यांची 16 वर्षीय पिडीत बालिका हिस तिचे मतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन तिन आरोपींनी, फिर्यादी या कामानिमित्ताने बाहेर गेले असल्याची संधी साधून पिडीत मतिमंद बालिकेला एका नाल्याच्या पुलाखाली नेऊन तिचेवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाणेत भा.द.वि.क.-376(2)(जे)(एल),376 (ड),34 अन्वये सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5 (जी) (के) व 6 प्रमाणे गुन्हयातील तिनही आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला होता. व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आली होती.
शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस.शुक्ला यांनी सदरचा गुन्हयाचा तपास महिला पोउपनि-प्रियदर्शनी थोरात यांचेकडेस दिला. मपोउपनि- प्रियदर्शनी थोरात व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुद् मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायाधीश-1, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, सी.एस.दातीर, नंदुरबार यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका वय-16 वर्षे,बालिका प्रत्यक्षदर्शी वय-16 वर्षे, साक्षीदार, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, नंदुरबार यांनी तिनही आरोपींना भा.द.वि.क.- 376 (ड) अन्वये दोषी ठरवत 20 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे तसेच भादवि क 376 (2)(जे) प्रमाणे दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता ॲड.एस.ए.गिरासे यांनी काम यांनी पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोउपनि- राहुल भदाणे, पैरवी अंमलदार पोहेकॉ परशुराम कोकणी व पोशि देविदास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.