नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील काकर्दे येथील कै.फुलाबाई तुकाराम माळी यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाचे औचित्य साधून माळी परिवार व काकर्दे ग्रामपंचायतच्या वतीने स्मशानभूमी १५ वृक्षांची लागवड करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील रहिवासी फुलाबाई तुकाराम माळी यांचे दि.२६ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या दशक्रियाविधी व उत्तरकार्य कार्यक्रमाचे औचित्य साधून काकर्दे गावातील स्मशानभूमी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कै.फुलाबाई माळी या मनसेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश पुंडलिक माळी यांच्या आजी तर काकर्दे ग्रामपंचायतच्या सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या आजल सासू होत्या.
गावातील प्रथम नागरिक असलेल्या सरपंच रेखाबाई माळी यांनी आपल्या घरापासूनच अनोख्या उपक्रमाची सुरुवात त्यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून केली आहे. माळी कुटुंबीयांनी कै.फुलाबाई माळी यांच्या दशक्रिया विधीनिमित्त काकर्दे ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या स्मशानभूमीत जाऊन विविध प्रकारच्या पंधरा वृक्षांची लागवड करून वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे. याप्रसंगी पुंडलिक तुकाराम माळी, महादू तुकाराम माळी, संतोष जगन्नाथ माळी, रवींद्र महादू माळी, प्रवीण पुंडलिक माळी, संदीप महादू माळी, राकेश पुंडलिक माळी व ग्रामस्थ उपस्थित होते. काकर्देतील माळी कुटुंबीयांनी वृक्षारोपण करत अनोखा संदेश दिला आहे.