नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे पावरा समाज मंडळातर्फे गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.
समस्त आदिवासी पावरा मंडळातर्फे देवमोगरा माता मंदिर सभागृहात विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पावरा – बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून आय.आर.एस अजय खर्डे,सुरेश मोरे,जेलसिंग पावरा,अर्जुन पटले,धर्मराज पावरा,बन्सीलाल पावरा आदी उपस्थित होते.
नंदुरबारात शहरातील पावरा समाजातील दहावी,बारावी,गुणवंत विध्यार्थ्यांसह वैद्यकीय,इंजिनिअर, कला,क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विध्यार्थ्यांचा व समाजातील पदोन्नती कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणजित पावरा,उपाध्यक्ष दिपक पावरा,प्रा.सरदार पावरा,प्रा.भिमसिंग चव्हाण,तमन्ना भंडारी,लता पावरा,डॉ.संजय पावरा,इंजि.सायसिंग पावरा,राकेश पावरा,प्रविण पावरा,सुभाष पावरा,कांतीलाल पावरा,विजय पावरा,विजय पावरा,संदीप पावरा,अशोक पावरा आदींनी परिश्रम घेतले.
पावरा समाजातील उच्च विद्याविभूषित कै. शितल नारसिंग पावरा पी.एचडी धारक मुलगी अल्पशा आजाराने मृत झाल्याने पावरा समाज मंडळ नंदुरबार तर्फे मरणोत्तर विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.