नंदुरबार l प्रतिनिधी
आपण आतापर्यंत जिल्ह्यात विविध विषयांसंदर्भात विकास कामे केली आहेत. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी देण्यासाठी पूर्णपणे आपण कटिबद्ध राहणार आहोत. आपल्या समाजातील जेष्ठ मंडळींनी सुरुवातीच्या काळात जी साथ दिली ते माझ्या सोबत सावलीसारखे उभे राहिले त्यामुळे मी आज इथे आपल्यासमोर उभा असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
येथील ज्ञानदीप सोसायटी मधील मराठा पाटील समाज मंडळ तर्फे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार बांधकाम भूमिपूजन 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील मराठा पाटील समाज मंडळातर्फे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार बांधकामासाठी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दोन कोटी रुपये निधी दिला आहे. त्या अंतर्गत या बांधकामाचे भूमिजन
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष बी एस पाटील हे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महासंसदरत्न खा डॉ हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित, श्रीमती उषाबाई हरिभाऊ पाटील,ॲड. पी एम देशपांडे , युवराज पाटील हे उपस्थित होते.
यावेळी मंत्री गावित यांनी सांगितले की आपण ज्या कामासाठी निधी देत आहोत. त्याच्या उपयोग समाजाला व्हावा यासाठी भरीव असा दोन कोटीचा निधी देण्यात आला त्या माध्यमातून आपल्याला तो उपयोगात पडू शकतो.
यावेळी खा. डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात बी एस पाटील यांनी या मंगल कार्यालयासाठी किती वर्षापासून व कशा संघर्ष करावा लागला. या संदर्भात माहिती दिली. समाज बांधवांसाठी विविध उपक्रम समाज मंडळ तर्फे राविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव यशवंत पाटील, विश्वास पाटील, शालिग्राम पाटील, निंबाजीराव बागुल, रमेश मोरे, विलास अहिरराव, राजेंद्र बागुल, डॉ एस आर पाटील, जितेंद्र पाटील, रवींद्र पाटील, मधुकर पाटील,लहू पाटील, प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, प्रा. डॉ. एन डी नांद्रे, अजय पाटील, कल्याण पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक यशवंत पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ एन डी नांद्रे यांनी मानले.
शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या धर्मपत्नी उषाबाई हरिभाऊ पाटील यांच्या यापूर्वी तीस लाख रुपयांची भरीव देणगी दिल्याबद्दल विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.