नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा परिषद येथे मानव विकास मिशन अंतर्गत 900 विद्यार्थिनींना सायकली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
यावेळी उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, भावेश सोनवणे, यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते. नंदुरबार तालुक्यासाठी सुमारे ९०० विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आले. शहर व तालुक्यातील विविध शाळा मधील विद्यार्थिनींना सदर सायकली वाटप करण्यात आले आहे. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.