नंदुरबार l प्रतिनिधी-
एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल येथे खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सिकलसेल अॅनिमिया या गंभीर अनुवांशिक विकाराशी लढा देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सिकलसेल स्क्रीनिंग कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर प्रकल्प हा “द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने” यांच्या अर्थसहाय्याने तर जिल्हा प्रशासनाच्या पाठिंब्याने आणि पब्लिक हेल्थ टेक्नॉलॉजी ट्रस्ट (पीएचटीटी) द्वारे राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एक पथदर्शी सिकलसेल तपासणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश 14 ते 19 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांची चाचणी आणि समुपदेशनासाठी ओळखणे आणि त्यांना मदत करणे हा आहे. या कार्यक्रमास आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, डॉ. अमित पाटील (ADHO नंदुरबार), डॉ. संदिप पुंड (ADHO नंदुरबार), नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ. अनिल गावीत हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, सिव्हिल सर्जन डॉ. नरेश पडवी यांच्या सहकार्याने एकलव्य शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी, डॉ. विनिता श्रीवास्तव (सल्लागार आदिवासी आरोग्य, GOI), डीन मेडिकल कॉलेज नंदुरबारडॉ. अरुण हुमणे, श्ल्लागार सब्यसाची दत्ता, कार्यक्रम प्रमुख सुखबीर सिंग () PHTT) आणि प्रोजेक्ट मॅनेजर शशांक भट्ट यांचे कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभल्याचे संस्थेने कळविले आहे.
सिकलसेल अॅनिमिया, एक आनुवंशिक रक्तविकार, नंदुरबार जिल्ह्यासह जगभरातील विविध समुदायांना विषमतेने प्रभावित करते. 2047 पर्यंत सिकलसेल रोगाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या व्यापक राष्ट्रीय उपक्रमात सिकलसेल स्क्रीनिंग कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. लवकर ओळख, समुपदेशन आणि सहाय्य सेवा यासारख्या सक्रिय उपायांद्वारे, विशिष्ट वयोगटातील विद्यार्थी नंदुरबारमधील शाळांमध्ये शिकतात. जिल्ह्यात सिकलसेल अॅनिमियासाठी सर्वसमावेशक तपासणी केली जाईल. शिवाय, सिकलसेल रोगाचे निदान झालेल्या मुलांच्या पालकांचीही तपासणी केली जाईल.
केवळ बाधित व्यक्तींचे निदान करणे हेच नाही तर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्थन आणि समुपदेशन करणे हे देखील यामागचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये सिकलसेल अॅनिमियाचा लवकर शोध आणि व्यवस्थापन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.