नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल येथे बाल आनंद बाजार मेळावा संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी 25 विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूलतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात.
आज 3 फेब्रुवारी शनिवार रोजी जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल उमर्दे खुर्द येथे बाल आनंद बाजार मेळावा आयोजित करण्यात आला. सदर बाल आनंद बाजार चे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक शगुलाब महारु मराठे यांनी केले.या बाल आनंद बाजारासाठी माजी केंद्रप्रमुख वसंत पाटील ,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कदमबांडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
या बाल आनंद बाजारामध्ये एकूण 25 विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती या संपूर्ण बाजारामध्ये एकूण 5 हजार 700 रुपयाची उलाढाल झाली. सदर आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र नारायण बागुल, ज्येष्ठ शिक्षिका मीना वसंत पाटील व सहशिक्षक निलेश हिरालाल चव्हाण यांनी प्रयत्न केले