नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी साक्री तालुक्यातील उंबरखेड परिसरातील म्हणजे चौपाळे गटातील रस्ते विकासासाठी तब्बल 50 कोटी रुपयांची मंजुरी दिली असून 15 दिवसात कामांना सुरुवात होईल. त्याचबरोबर काबऱ्या खडक तलाव दुरुस्तीसाठी नुकतेच मी 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शिवाय आमळी येथील श्री कन्हैयालाल महाराज मंदिरासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे; अशी माहिती खा. डॉ.हिना गावित यांनी साक्री तालुक्यातील उंबरखडवा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना दिली.
एकही घर पाण्याविना राहू नये, गाव तिथे रस्ता झालाच पाहिजे, विजेचा प्रश्न सोडवला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील महिलांचे सशक्तिकरण देखील झाले पाहिजे हा आमच्या कार्याचा उद्देश आहे. महिला सशक्तिकरण व्हावे म्हणून केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येक महिला बचत गटाला चार लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध करून देत आहोत त्याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील खा. डॉ.हिना गावित यांनी केले.
साक्री तालुक्यातील उंबरखडवा येथे अर्जुन सागर ऍग्रो प्रॉडक्ट कंपनीचे उद्घाटन, विकास कामाचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळावा आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, धुळे येथील प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते वसंत घरटे, जिल्हा परिषद सदस्य खंडू कुवर, भाजपाचे साक्री विधानसभा प्रमुख इंजिनीयर मोहन सूर्यवंशी, जिल्हाचिटणीस केटी सूर्यवंशी, पिंपळनेरचे विकी कोकणी, रामलाल जगताप व स्थानिक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सजवलेल्या रथावरून वाजत गाजत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खा.डॉ. हिना गावित यांची काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. उंबरखेड चे सरपंच संदीप चवरे, आंबापाडाचे गोकुळ गवळी, कुडाशीचे वसंत अहिरे आदींसह या मेळाव्याला लगतच्या 50 हून अधिक गावांचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित आणि खा.डॉ.हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्या प्रमाणेच धुळ्याच्या साक्री तालुक्यात देखील विकास कामांचा धुमधडाका लावला असल्याबद्दल उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांनी घरकुल योजना, शेळी आणि गाय वाटप योजना आणि तत्सम योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना बेरोजगार तरुणांसाठी अर्थसाह्य देणारे योजना, शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य आणि ट्रॅक्टर सारखी वाहने देणाऱ्या योजना लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली.








