नंदुरबार l प्रतिनिधी-
दिपावलीनिमित्त नंदुरबार शहरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते कमी प्रदूषण होणारे फटाके वाटप करण्यात आले. फटाके मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. खासदारांनी विद्यार्थ्यांसमवेत एक सेल्फी घेवून दीपोवली उत्सव साजरा केला.

नंदुरबार शहरातील डी.आर.हायस्कूलमध्ये चिमूकल्यांना फटाके वाटप कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावित होत्या. यावेळी माजी नगरसेवक वसईकर, पत्रकार योगेंद्र दोरकर, केतन रघुवंशी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खा.डॉ.हिना गावित यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दिपोत्सव आनंदात साजरा करून कमी प्रदूषण होणारे फटाके फोडावे, विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत जावे तसेच खूप अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावे, असे आवाहन त्यांनी चिमूकल्या विद्यार्थ्यांना केले. यादरम्यान खा.डॉ.हिना गावित चिमूकल्यांचा सेल्फी घेवून दिपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे आई-वडील व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केतन रघुवंशी यांनी केले.








