Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना

team by team
October 3, 2021
in राज्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी संबंधित मतदारांना भरपगारी सुटी किंवा पुरेशी सवलत द्यावी, अशा सूचना जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांनी दिल्या आहेत.
श्री. रुईकर यांनी म्हटले आहे, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचीत राहतात. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार 5 ऑक्टोबर 2021 रोजी  नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे, की निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले, तरी ही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.  ही सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने आदींना लागू राहील (उदाहरणार्थ खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर,  मॉल्स, रिटेलर्स आदी).
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे देणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधितांसोबत मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने,  दुकाने इत्यादींचे मालक, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे पालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. सर्व उद्योजक, आस्थापना, मालकांनी त्यांच्या उद्योगात, आस्थापनेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदार कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर नमूद केल्याप्रमाणे सुट्टी अथवा सवलत द्यावी.
बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रात्रभर फिरून जिल्ह्यात राबविले कोंबींग आपरेशन, ४७ गुन्हेगारांना अटक, टँकर चोरीही उघडकीस, गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले ४ कोरोना रुग्ण, अक्कलकुवा शहादा तालुक्यांचा समावेश

Next Post
नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात  आढळला कोरोना रूग्ण

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले ४ कोरोना रुग्ण, अक्कलकुवा शहादा तालुक्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add