नंदुरबार l प्रतिनिधी
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखपदी माजी नगरसेविका ज्योती योगेश राजपूत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र महिला संपर्कप्रमुख प्रणिता पर्णिता पोंक्षे यांच्या हस्ते देण्यात आले.
नंदुरबार शहरातील सी.बी गार्डन सभागृहात बैठक घेण्यात आली.संपर्कप्रमुख पर्णिता पोंक्षे,माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.त्यानंतर माजी नगरसेविका ज्योती योगेश राजपूत यांना नियुक्तीपत्र दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्ष मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सौ.राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मराव आनंद दिघे यांची शिकवण यांच्या सक्रियपणे प्रचार प्रसार करावा असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
यावेळी याप्रसंगी माजी नगरसेविका सोनिया राजपूत, भारती राजपूत,ज्योती पाटील,मनीषा वळवी, मेहरुंनासाबी मेमन, फैमिदाबानो कुरेशी,पंचायत समितीच्या माजी सभापती माया माळसे, पं.स सदस्या अंजना वसावे, दीपमाला पाडवी,बायाजाबई भिल, कालाबाई भील,बेगाबाई भील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.