नंदुरबार l प्रतिनिधी
10 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून जी. टी. पाटील महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ एम जे रघुवंशी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाताडॉ. अरुण यशवंतराव हुमणे, तसेच प्रमुख वक्ता म्हणून सहाय्यक प्राध्यापक मानसोपचार विभाग शासकीय मेडिकल कॉलेज डॉ. दिनेश वळवी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक माननीय डॉ. एम एस रघुवंशी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मानसशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. यु. अहिरे यांनी केले. तर मानसिक आरोग्य बद्दल आपले मनोगत मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस आर सूर्य व्यक्त केले.तसेच सूत्रसंचालन धनश्री रामचंद्र वानखेडे व आभार प्रदर्शन कु. सपना सोनवणे हे मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले.