नंदुरबार-येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव दिनेश मराठे यांनी जि.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री ना.अब्दुलजी सत्तार, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत भालेर येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
दिनेश मराठे हे गेल्या ९ ते १० वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत होते. काही वैयक्तिक कारणास्तव त्यांनी आपला मनसे तालुका सचिव पदाचा राजीनामा दिला. भालेय जाहीर सभेत त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, माजी जिल्हाप्रमुख दिपक गवते, उपजिल्हाप्रमुख रविंद्र गिरासे, खोंडमळी जि. प.गटाचे उमेदवार गजानन पाटील, काकर्देचे सरपंच प्रकाश माळी, माजी सरपंच रविंद्र माळी, राधेश्याम शिंदे, सुरेश ठाकरे आदी उपस्थित होते.