नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरुन तथा भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या सुचनेनुसार नंदुरबार जिल्हाभरात प्रत्येक गावांत व बुथवर हर घर तिरंगा अभियान राबविणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियान भाजपातर्फे जिल्हयाभरात राबविण्यात येणार आहे.प्रत्येकाने आपल्या घरावर 15 ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा लावुन मानवंदना देण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी केले आहे. भारतीयांच्या मनात देशभक्ती जागृत रहावी तसेच देशासाठी शहिद झालेल्या विरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणी नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हयातील प्रमुख शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच देशासाठी सर्वस्व अर्पण केल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या पुर्वसंध्येला दि.14 ऑगस्ट ला विभाजन विभीषीका (फाळणीच्या वेदना) स्मृतीदिवस निमित्ताने जिल्हयाभरात नंदुरबार, शहादा, नवापुर, अक्कलकुवा शहरात प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दिली आहे.








