नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी.आर.हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायण भदाणे,उपमुख्याध्यापक पंकज पाठक,पर्यवेक्षक विपुल दिवाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पूजन करत मोहित मराठे या विद्यार्थ्याने वसुंधरा गीत सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून लोकसंख्येचे दुष्परिणाम व उपाय यावर प्रत्येकाचे कर्तव्य स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व अतिथी शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण माहितीतून विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सुभाष चौधरी यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे सामान्य होणारे माणसावर दुष्परिणाम बेरोजगारी,उपासमारी व गुन्हेगारी प्रवृत्तीत होणारी वाढ यावर खंत व्यक्त करत आपले मत स्पष्ट केले.
लोकसंख्या दिनानिमित्त शाळेत विविध गटात चित्र रंगभरण,वक्तृत्व, घोषवाक्य व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात निबंध स्पर्धेत यशाचे मानकरी ठरलेले विद्यार्थी गुरुदीप गवळी,सार्थक पवार,कार्तिक नुक्ते,वेदांत पाटील, सांई पाटील, मुजतबा पिरजादा,तेजस वाडेकर, सांईदीप वसावे,तन्मय चौधरी, जरीयान लोहार.
वक्तृत्व स्पर्धेत विराज वायकर,हर्षवर्धन शिंदे,स्वप्निल पाटील,सार्थक पवार,हितेश बावा,आयुष नाईक,
घोषवाक्य स्पर्धेत प्रज्योत परदेशी,तेजस वाडेकर,मोहम्मद पीरजादा,आर्या वसईकर, मधुसूदन राजपूत,
चित्र रंगभरण स्पर्धेत आयुष चित्ते,लकी मराठे,सोहम माळी, हर्षल पाटील,स्मित सौंदाणकर, कार्तिक सोनवणे,तन्मय चौधरी,सुजित पाटील,हर्षद कापसे,मयूर राठोड यशस्वी ठरले.
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेचे परीक्षण तुषार नांद्रे,दिपाली भदाणे, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण मिलिंद चव्हाण,प्रशांत जानी,विशाल मच्छले,
चित्र रंगभरण स्पर्धेचे परीक्षण देवेंद्र कुलकर्णी, अशोक वसईकर] घोषवाक्य स्पर्धेचे परीक्षण कमल चौरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगिता साळी,सत्कार व परिचय तुषार नांद्रे, बक्षीस यादी वाचन भरत पेंढारकर तर ऋणनिर्देश कमल चौरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर,निलेश गावीत,प्रशांत पाटील दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन तर शिक्षकेतर कर्मचारी गजानन अहिरे व मनोज परुळेकर यांनी परिश्रम घेतले.