नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित नंदुरबारतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात 32 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
शहरातील ब्राह्मणवाडी सभाग्रहात रक्तदान शिबिराचे उद्घाटन पतपेढीचे चेअरमन नानाभाऊ माळी यांच्या हस्ते झाले.यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस नानाभाऊ ओंकार माळी यांनी पुष्प अर्पण केले तर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन पतपेढीचे व्हाईस चेअरमन मोहन सखाराम चौधरी यांनी केले.याप्रसंगी संचालक प्रसाद नारायण बेहेरे, भगवान बाबूलाल माळी, सचिव पांडुरंग शंकर माळी, जनकल्याण रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अर्जुन लालचंदाणी उपस्थित होते.शनिवारी झालेल्या रक्तदान शिबिरात तंत्रज्ञ मधुसूदन वाघमारे, आकाश जैन, अशोक पवार, मदतनीस संजय सूर्यवंशी, यांनी सहकार्य केले.पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतपेढीचे सेवक वर्ग, कर्मचारी आणि अल्पबचत प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.