म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील जि. प. मराठी मुलींची शाळा येथे G 20 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान जन चळवळ उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील प्राचार्य जगराम भटकर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, ज्येष्ठ अधिव्याख्याता संदीप मुळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, नूतन गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश साळवे (पंचायत समिती शहादा), साधन व्यक्ती मनोज खैरनार, तसेच विषय तज्ञ हेमंत पाटील यांनी शाळेला भेट दिली.
FLN उद्दिष्ट अंमलबजावणी याबाबत सरपंच, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना गटात बसून शैक्षणिक साहित्याच्या वापर याबाबत मार्गदर्शन केले. भेटीत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधला. G.20 थीम उत्साहात साजरी करण्यासाठी डायट अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक केले.
प्राचार्य जगराम भटकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, समावेशक दृष्टिकोन ठेवून ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी व निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी समतेच्या दृष्टिकोन ठेवून एकेका छोट्या समूहाला शिकवण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. त्यासाठी शिक्षकांनी काय करावे. तसेच पालकांची भूमिका, पालक – शिक्षक व माता पालक गटांनी काय काम करावे. याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.
तसेच नूतन गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश साळवे यांनी आपल्या मार्गदर्शनास सांगितले की, G 20 Summit दि. १९ जुन ते २२ जुन २०२३ दरम्यान पुणे येथे आयोजित होत असून त्या अनुषंगाने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयावर लोकसहभागातून G 20 च्या अनुषंगाने जनजागृती व्हावी. यासाठी शिक्षकांनी दिनांक १ जून ते १५ जून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे तसेच उपक्रमाचे आयोजन करावे. तसेच तारखेनुसार उपक्रमांच्या फोटो व्हिडिओ अहवाल पाठवावा असे सांगण्यात आले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच युवराज ठाकरे, केंद्रप्रमुख पी.आय चव्हाण, उपसरपंच सविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, अशोक धनगर, चिंतामण लांडगे, अक्काबाई ठाकरे, पमाबाई सुकळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वरभाऊ शिरसाठ, ग्राम विकास अधिकारी बी.पी. गिरासे, शिक्षण प्रेमी चुनीलाल अहिरे, रमेश ठाकरे, केंद्र मुख्याध्यापक पंडित रावताळे, कोकणपाडा शाळेचे मुख्याध्यापक विठोबा पावरा, स्नेहल कुवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रातील सर्व शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले.शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे यांनी मानले.