म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेची नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून नवजीवन विद्यालयाचे लिपिक अमित मराठे यांची जिल्हा अध्यक्षपदी व श्राॅफ हायस्कूलचे लिपिक जयेश वाणी यांची सचिव पदी नियुक्ती कार्याध्यक्ष म्हणून डी.पी. महाले यांच्यावर पदभार सोपविण्यात आला आहे.


शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण संघटना म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे मोठे योगदान राहिले आहे. शालेय कामकाज अधिकारी स्तरावर सुकर होण्यात या संघटनेचा मोठा हातभार आहे.या संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया 3 जून रोजी झालेल्या सर्व साधारण बैठकीत नुकतीच बिनविरोधपणे पार पडली. अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक प्रभाकर शिवाजी ओगले उपस्थित होते.नुतन अध्यक्ष म्हणून अमित मराठे, सचिवपदी जयेश वाणी तर कार्याध्यक्ष म्हणून न्यू हायस्कूल तळोद्याचे डी.पी. महाले यांची निवड करण्यात आली.शालेय शालेय स्तरावरील व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्याची हातोटी, कसब आदी गुणहेरून त्यांच्यावर पदभार सोपविण्यात आला.
नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी नवनियुक्तांचा सत्कार केला.श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्या सौ. सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक सौ. विद्या सिसोदिया, जगदीश पाटील आदींनी अभिनंदन केले.
कार्यक्रमा प्रसंगी सय्यद इसरार अली, जुबेर शेख, प्रशांत पवार, योगेश निकुंभ, निलेश पाटील, संजय भामरे महेंद्र चकोर, जसवंत परदेशी, प्रमोद बारी, नेहा शर्मा, सपना भामरे, विवेक वंजारी त्याच प्रमाणे सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.