नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील एका नर्सरीतून कृषी विभागाच्या पथकाने एक लाख ४३ हजाराचे विनापरवाना बोगस कापूस बियाणे जप्त केले असून याप्रकरणी नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नंदूरबार तालुक्यात विना परवाना कापूस बी. टी.चे बोगस बियाणे विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला होती.तसेच अहमदाबाद येथून गॅलेक्सी फाईव्ह जी ( एच. टी.बी.टी) वान नंदूरबार तालुक्यात दाखल झाल्याचे कळल्याने कृषी विभागाचे भरारी पथक तालुक्यातील बामडोद, खोंडामळी,विखरण, भागसरी आदी गावात दिवस, रात्र गस्त घालत होते.गॅलेक्सी फाईव्ह जी ( एच. टी.बी.टी) हे वान यापूर्वी विक्री केले होते मात्र उगवण न झाल्याने शेतकरी विक्रेत्यांवर तगादा लावित होते.
मात्र पक्की पावती नसल्याने शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करत न्हवते.दरम्यान काल दि.३१ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने नंदूरबार तालुक्यातील बामडोद येथील मंजुळाबाई नर्सरी येथे छापा टाकला असता तेथे हे बोगस बियाणे आढळून आले. सदर बियाणे हे अहमदाबाद येथून ट्रान्सपोर्ट ने सुरेश पाटील यांच्या नावाने आल्याचे पोत्यावरून लक्षात आले.या कारवाईत एक लाख ४३ हजाराचे १०२ पाकिटे जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी नंदूरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात सुरेश हिरामण पाटील रा.बामडोद ता.नंदूरबार, दीपक बन्सी कोळी रा. समशेरपुर ता.नंदूरबार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांच्या मार्गदर्शनाने तंत्र अधिकारी संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी पी.आर. खरमाळे, पंचायत समिती कृषी अधिकारी योगेश हिवराळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी,नंदूरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, महेश पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे.