नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित नंदुरबार जिल्हा केंद्राच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये व विचारांन्वये परीसरातील विविध नद्या ह्या जलवाहिनी नसून जीवन वाहिनी आहे.यासाठी गंगा दशहरा सप्ताह आयोजित करण्यात आला व त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित मार्गातील पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत प्रकाशा येथे सुर्यकन्या तापी माता नदी व या नदीच्या पात्राची संपूर्ण पणे स्वच्छता करून सदर नदी व परिसराचा भाग स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच जवळपास 3 ट्रॅक्टर केर-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
त्यानंतर ज्या नदीच्या प्रवाहामुळे परिसरातील नंदुरबार जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील गाव ही सुजलान व सुफलान होतात त्या नदीचे ऋण तर आपण मानवीजीवन फेडूच शकत नाही पण त्या नदी देवीला साडीचोळी व शृंगाराच्या आहेर देऊन त्या नदीआईचा मानसन्मान करण्यात आला व तिच्या प्रवाहातून या परिसरातील शेतकऱ्यांचे व त्यावर आधारित जीवन जगणारे इतर गावकरी यांच्या घरात धनधान्य,सुख-समृद्धी ही कायम राहावी यासाठी तापीनदी आईचा आशीर्वाद प्राप्तीसाठी प्रार्थना विनंती करण्यात आली.
पर्यावरणाचे समतोल रहावे यासाठी या नदी परिसरामध्ये विविध प्रकारचे 11 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले व ते वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुष्पदंतेश्वर व केदारेश्वर पिंड रुद्र सेवा करण्यात आली.नंदुरबार जिल्ह्यातील व लगतच्या गुजरात राज्यातील काही गाव दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून गाव दत्तक घेण्यात आले असून या गावात या दिंडोरी प्रणित मार्गाच्या 108 विविध विकासाच्या योजना राबविण्यात येणार आहेत.या योजनेच्या माध्यमातून गावाची आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैशैक्षणिक,कृषी,पर्यावरण व आर्थिक प्रगती साधली जाणार आहे.या व अशा प्रकाराच्या विविध विभागाच्या योजनेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर या दत्तक घेतलेल्या गावाचा विकास साधण्याच्या दृष्टीने सेवखकार्य सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील मान्यवर यांच्यासह संपूर्ण सेवेसाठी 1100 सेवेकरी उपस्थित होते. या गंगा दशहरा सप्ताह यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा केंद्रतील काका,भाऊ, ताई व मावशी आदी स्वामी सेवेकरी यांनी सेवा रुजू केली.