नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्राॅफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.गणेश पाटील यांना इंदौर येथील माॅं भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
इंदौर येथील हाॅटेल सयाजी मध्ये सन्मान सोहळा झाला. यावेळी इंदौरचे खा. शंकर लालवानी हे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती डाॅ.दिप्ती भदोरीया, चेअरमन डाॅ.संतोष भार्गव, रजिष्टार डाॅ.विद्दा सिंह, मनिलाल शिंपी यांच्या उपस्थितीत पदवीप्रदान सोहळा झाला. नंदुरबार येथील प्रा.गणेश पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय विषयावरं जवळपास हजाराच्या वरती प्रबोधनात्मक व्याख्याने दिली आहेत. तंबाखूमुक्ती,एडस जनजागृती, वृक्षारोपन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, संविधान जनजागृती, मतदान जनजागृती अशा अनेक विषयांवर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.
विविध कार्यक्रमाचे सुत्रसंचालक म्हणूनही कार्य करीत असतात. शैक्षणिक दृष्टया प्रा. गणेश पाटील सात विषयात एम ए. एम.एड देखील आहेत. अशा अनेक विषयांचा त्यांच्या मानद डाॅक्टरेट सन्मानासाठी विचार करण्यात आला. इंदौर येथील माॅं भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने मानद डाॅक्टरेट पदवीने प्रा.गणेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या मानद डाॅक्टरेट बहुमानाबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन अॅड.रमण शाह, सचिव डाॅ.योगेशदेसाई प्राचार्या सुषमा शाह, कनिष्ठ महाविद्दालयाचे विभाग प्रमुख प्रा.चंद्रकांत सोनवणे, उपमुख्याधायापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्दा सिसोदिया, जगदीश पाटील ,तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.