तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्री शक्ती समाधान शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.हे शिबीर तळोदा तहसील कार्यालय व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.शिबिरासाठी सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती लताबाई अर्जुन वळवी यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी. पी. कोकणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी रणजीत कुर्हे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरा बाबतची भूमिका स्पष्ट केली. महिलानी पुढे येऊन आपल्या समस्या मांडाव्यात त्यावरती नक्कीच प्रशासनाकडून समाधान करण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले.
तळोदा तहसीलदार गिरीश वखारे यांनी शासन महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देत आहे. अनेक महिला संकटांना सामोरे ही जात आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यांचे निराकरण झाल्यास आयुष्य नक्कीच सुखकर होईल. या भूमिकेतून शासनाने सुरू केलेल्या समाधान शिबिरामध्ये स्वतःच्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे यासाठी आवाहन त्यांनी केले. सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या योजनाही उपस्थित महिलांसमोर मांडल्या.शिबिरात शंभरावर महिलांनी आपल्या विविध समस्या मांडल्यात व त्यांचे समाधान विविध संबंधित अधिकारी यांनी केले.
शिबिरात माहितीपर पोस्टर प्रदर्शन, अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार व भरडधान्य यांचे महत्व सांगणारे विविध स्टोल लावले होते.त्यास उपस्थितांनी आवर्जून भेट देत माहिती करून घेतली. कार्यक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेन्द्र चव्हाण,तालुका कृषी अधिकारी श्री नरेन्द्र महाले,गटशिक्षण अधिकारी श्री.शेखर धनगर,पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विश्वास नवले,मुख्याधिकारी सपना वसावा,जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे श्री. लोखंडे, आदी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात श्रीमती लताबाई वळवी यांनी महिलांनी निःसंकोचपणे पुढाकार घेऊन शासकीय योजनाचा लाभ घ्यावा,असे महिलांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पर्यवेक्षिका,विस्तार अधिकारी श्री गावित,तालुका संरक्षण अधिकारी,DCPU युनिट चे कर्मचारी,आरोग्य विभाग,आदींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील बालविकास प्रकल्प अधीकारी रणजित कुऱ्हे, विस्तार अधिकारी एच. आर. गावित , संरक्षण अधिकारी श्री. गोसावी ,पर्यवेक्षिका श्रीमती सरला वळवी, श्रीमती ललिता खर्डे, श्रीमती मंगला वसावे, श्रीमती अंजना वळवी, श्रीमती मोगरा वळवी व श्रीमती मीरा मिस्त्री यांनी संयोजन केले.