तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील प्रत्येक कॉलनी व गल्लींमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. व संपूर्ण शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. यामुळे तळोदा शहरातील स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वखर्चाने ४ स्वच्छतादूतांची नेमणूक करून त्याचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. नगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागाचे ३८ कर्मचारी असून फक्त १० ते १२ कर्मचारी हे तळोदा शहरातील स्वच्छतेसाठी काम करत असतात इतर कर्मचारी कुठे असतात असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी केला व नगरपालिकेवर तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली.
तळोदा शहरातील अनेक वसाहती, गल्लींमध्ये स्वच्छता कर्मचारी येत नसल्यामुळे तेथील गटारी, कचरा उचलण्यात येत नाही. व यामुळे तेथील परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन दुर्गंधी पसरत असते. तसेच अनेक भागांमध्ये कुत्रा, डूक्कर मेलेले असतात ते देखील लवकर उचलले जात नाही. यामुळे शहरातील नागरिकांना याचा मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो. तळोदा नगरपालिकेवर गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासक आहे. परंतु नागरिक आपापल्या प्रभागातील नगरसेवकांना फोन करून सांगत असतात की गटारी साफ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी पाठवा, कुत्र मेलेले आहे.
कर्मचारी पाठवा अश्या विविध कामासाठी फोन करून सांगत असतात. माजी नगरसेवक हे पालिकेत फोन करून सांगतात तेव्हा पालिकेकडून स्वच्छतेचे टेंडर निघाले नाही आहे. कर्मचारी नाही आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष योगेश मराठे, माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, माजी नगरसेविका अनिता परदेशी, संदीप परदेशी यांनी तळोदा शहरासाठी ४ स्वच्छतादुतांची नेमणूक स्वखर्चाने करून दिली आहे. हे स्वच्छता दुत संपूर्ण शहरातील कुठल्याही भागात गटार भरलेली असो किंवा कुत्र मेलेले असेल, डुक्कर मेलेले असेल ते उचलण्याच काम हे करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस ने तळोदा शहरासाठी नेमलेल्या या स्वच्छता दुत कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी या स्वच्छतादूत लोकार्पण च्या कार्यक्रमाला शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,संचालक खरेदी विक्री संघाचे चंदू भोई,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख नुरा, याकूब पिंजारी, साबीर आली सब्दार अली, मुश्ताक अली, शेख रफिक, सईद पठाण, संजय राणे,नासीर हारून माजी नगरसेवक गणेश पाडवी, सरचिटणीस महेंद्र पोटे, खजिनदार धर्मराज पवार,संघटक राहुल पाडवी, शहर उपाध्यक्ष अनिल पवार,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, नितिन वाघ यु.सरचिटणीस,
इंद्रजीत राणे,वैभव कर्णकार,कार्तिक राजकुळे,इमरान शिकलीकर,प्रकाश पाडवी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तळोदा शहर हे दिवसेंदिवस वाढत असल्याने शहराची स्वच्छ तेची काळजी घेणे पालिकेची जबाबदारी आहे.परंतु तळोदा नगर पालिकेतील आरोग्य विभागात स्वच्छता विभागाचे ३८ कर्मचारी आहेत परंतु फक्त १० ते १५ कर्मचारीच शहरात स्वच्छतेसाठी काम करता असतात इतर कर्मचारी हे जातात तरी कुठे? तर काही कर्मचारी हे पुढाऱ्यांच्या घरी काम करतात व यामुळे तळोदा शहरातील स्वच्छतेचा अत्यंत बोजवारा उडाला आहे. यामुळे हा स्वच्छतेचा प्रश्न पालिकेने लवकरात लवकर सोडवून स्वच्छतेसाठी जास्त कर्मचारी नेमावे.
योगेश मराठे
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, तळोदा
स्वच्छतेचा ठेका संपून दोन महिने झाले आहे. तसेच स्वच्छतेसाठी नवीन टेंडर काढण्यासाठी निधीची आवश्यकता असते. जो पर्यंत निधी मिळत नाही तो पर्यंत टेंडर निघू शकत नाही. स्वच्छतेसाठी जरी ३८ कर्मचारी असेल तरी सर्व कर्मचारी हे गटार साफ करण्यासाठी देऊ शकत नाही. काही कर्मचारी हे शहरातील शौचालय साफ करणे, मुताऱ्या साफ करणे व इतरत्र कामासाठी लागत असतात.
सपना वसावा
मुख्याधिकारी तथा प्रशासक , तळोदा न. पा.