नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे डॉ. भोजराज आणि टीम यांच्या उपस्थितीत स्पाईन सर्जरी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात अत्यंत गरजू अशा ८ रुग्णांवर स्पाईन फाऊंडेशनच्या मुंबई च्या लीलावती हॉस्पिटलचे डॉ. शेखर भोजराज , पुण्याच्या जुपिटर हाॅस्पिटलचे डॉ.तुषार देवरे,डॉ हर्षित दवे,डॉ शिवा कुमार,डॉ डिंपल सिंग (मुंबई) डॉ तोसिफ सिकलगर,डॉ नरेश चौधरी, यांचे सह अर्चना भोजराज, रोशन कुले या स्पाईन फाऊंडेशनच्या टीमने जटील शस्त्रक्रिया पार पाडल्या
. त्यांना जिल्हा रुग्णालयातील डाॅ. संजय गावित, डॉ. किरण जगदेव डॉ.राहुल वसावे डॉ. मंगलसिंग पावरा,डॉ. सविता बंडीवाल,डॉ. स्नेहा जताळ व सपोर्टिंग स्टाफने सक्रिय सहकार्य केले. स्पाईन फाउंडेशन व लायन्स क्लब नंदुरबार गेल्या सहा वर्षांपासून मणक्यांच्या शस्त्रक्रियेचा उपक्रम राबवित आहे. यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे,डॉ.के.डी. सातपुते यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. आतापर्यंत एकूण ८४ शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या आहेत
.सदर शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व ऑर्थोपेडिक सर्जन्स २/३ महिन्यांत पेशंटची निवड करत असतात. या एका ऑपरेशनचा सर्वसाधारण २ लाखा पासून तर २५ लाखापर्यंत खर्च येत असतो.परंतु स्पाईन फाउंडेशन, लायन्स क्लब नंदुरबार व जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्यामार्फत हे ऑपरेशन्स पूर्णपणे मोफत केले जातात. ऑपरेशन नंतर ची काळजी जिल्हा रुग्णालय व लायन्स क्लब नंदुरबार च्या वतीने घेण्यात येते. भविष्यात हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू राहील असे लायन्स पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या शिबिरात झालेल्या जागतिक परिचारिका दिना निमित्त शिबिरातील सर्व सिस्टर व ब्रदर यांचा भेट वस्तू देवून क्लब तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.लायन्स क्लबच्या या शिबिरात समीर शाह . भावेश जैन,श्रीराम दाऊतखाने,राजेंद्र माहेश्वरी, शत्रूघ्न बालानी,आश्विन पाटील, लायन्स क्लब अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी , प्रोजेक्ट चेअरमन डॉ. राकेश पटेल व डॉ. सी. डी. महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.








