Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

team by team
May 11, 2023
in राजकीय
0
वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

मुंबई  l

 

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. श्री. मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृश्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला.

 

 

श्री.मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अॅण्ड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप – यूके’ (ओमपेग – युके) या संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांसोबत आंतरजालीय दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक आयोजित केली होती. या संघटनेचे पदाधिकारी रवींद्र गाडगीळ, आशुतोष देशपांडे, अभिजीत देशपांडे आणि जय तहसिलदार यांच्या पुढाकाराने ही बैठक यशस्वी झाली. लंडनस्थित मराठी उद्योजकांनी महाराष्ट्राच्या वन खात्याच्या, सांस्कृतिक कार्य खात्याच्या आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या विविध कार्यक्रम आणि योजनांमधेही सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

 

श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे यांचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय इतिहासातील महत्त्व, शिवराज्याभिषेकाचा यंदा होणारा त्रिशतकीय सुवर्णमहोत्सव, त्यानिमित्ताने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेले विविध कार्यक्रम यांची माहिती दिली. ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांसोबत जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्याविषयी झालेली प्राथमिक चर्चा यांची माहिती दिली. ब्रिटनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी लोकांनी ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहून जगदंब तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याची मागणी करावी असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले.

 

 

त्याप्रमाणे ब्रिटीश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहिण्याचा निर्णय आणि त्याकामी ब्रिटनस्थित सर्व भारतीयांचा सहभाग घेण्याचाही यावेळी ‘ओमपेग-युके’ च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर विविध ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी आणि ब्रिटिश सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी यांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत करण्याची मागणी करण्याचाही निर्णय या संघटनेने घेतला आहे.

 

 

श्री. मुनगंटीवार हे जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात आणण्यासंदर्भात ब्रिटिश सरकारशी बोलणी करण्याकरता जेव्हा लंडनला जातील, तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आणि या दैवी कार्यात आवश्यक तो सर्व सहभाग देण्याचे लंडनस्थित मराठी उद्योजकांनी या बैठकीतून आश्वासन दिले आहे. त्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच लंडनस्थित मराठी उद्योजकांनी ब्रिटनमधील इतर व्यवसायातील मराठी सोबतच अन्य भारतीय व्यावसायिक व नोकरदार मंडळींना याकामी सोबत घ्यावे, असे आवाहनही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याला लंडनस्थित मराठी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

Next Post

आमदार असावा तर असा …

Next Post
आमदार असावा तर असा …

आमदार असावा तर असा ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add