नंदूरबार l प्रतिनिधी
येथील समता युवा मंच तथा विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरिट नाका परिसर नंदुरबार वतीने महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त “मानवंदना महामानवास” या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री मा.ना डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह उपस्थित संसद रत्न खा. डॉ. हिना गावित व जिल्हा परिषद नंदुरबार अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान, कला क्रीडा, सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक चळवळ या माध्यमातून समता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका डॉ. नूतनवर्षा राजेश वळवी, प्राचार्या एस. ए.एम हायस्कूल, राजकारणातून समाज कार्य करत उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी झटणाऱ्या डोकारे साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित,
सामाजिक हित जोपासत कार्य करणारे डॉ. यशपाल जावरे, आदर्श नीपक्षपाती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात आपला ठसा उमटविणारे पत्रकार बाबासाहेब राजपूत कार्यकारी,मत्स्य सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे युवा उद्योजक प्रवीण शिरसाठ, अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रातून असंख्य खेळाडू घडविणारे प्रा.डॉ. दिनेश बैसाणे यांना “समता रत्न” या पुरस्काराने तसेच अल्पशा काळात जिल्हा परिषद प्रशासन अत्यंत जबाबदार व प्रभावीपणे हाताळणाऱ्या जिल्हा परिषद आपल्या दारी या अभिनव उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या दारापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषदेतील 2012 सालापासून प्रलंबित विविध पद भरतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही प्रभावी भूमिका मांडणाऱ्या, जिल्ह्यातील साठ शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय दिल्याबद्दल युवा नेतृत्व व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा. डॉ. सुप्रिया गावित यांना राज्यस्तरीय “समता भूषण” पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित तथा खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सुलभा महिरे , मनीष बिरारी, मंगेश वाघमारे, जितेंद्र खवळे, प्रांजल बैसाणे आदींचा स्तुत्य निवडी संदर्भात सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास नंदुरबार आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, नंदू गावित, , जि. प. सदस्य मोहन शेवाळे, एस.ए.एम मिशन हायस्कूलचे संचालक राजेश वळवी, नगरसेवक नरेंद्र नगराळे, चंद्रकांत नगराळे शहादा नगरसेवक जितू जमदाडे ,नानाभाऊ निकम अनिल कुवर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजू रगडे, पत्रकार जीवन पाटील, पत्रकार भूषण रामराजे, पत्रकार गौतम बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राम साळुंके सुभाष पानपाटील, सचिन पिंपळे, भैय्या बाविस्कर, जितेंद्र पानपाटील, प्रशांत पाटील ॲड. प्रेमानंद इंद्रजीत राहुल रामराजे सिद्धार्थ साळुंखे, गणेश शिरसाठ, गौतम पानपाटील, श्याम साळुंके, सुलतान पिंजारी, संतोष शिरसाट, अजित कुलकर्णी, दीपक बंडीवार, किरण खोकले आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षबोध बैसाणे यांनी केले.