नंदूरबार l प्रतीनिधी
नंदूरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिराजवळ काल दि.१ मे रोजी सकाळी १० वाजेसुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.माहिती मिळताच नंदूरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे पथकासह त्या ठिकाणी पोहचून त्यांनी पाहणी केली.दरम्यान अज्ञात मृतदेह असल्याने ओळख पटणे कठीण झाले.
त्यांनी याबाबत ओळख पटविण्याचे सोशल मीडियावर आवाहन केले. त्यानंतर दोंडाईचा येथील पत्रकार समाधान ठाकरे यांनी याबाबत पोलीस ठाण्याला कळविल्याने युवकाची ओळख पटली.
दोंडाईचा येथील जुन्या नगरपालिका मागील अशोक नगर रहिवासी व सध्या डाबरी घरकुल येथे राहणारे रघुनाथ कुष्णा पाटील यांचे चिरंजीव योगेश रघुनाथ पाटील (वय-२८) यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.तरुणाचा मृतदेह रघुनाथ कुष्णा पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.याप्रकरणी
पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे.