नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 व्या वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सोमवार 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय, नविन पोलिस कवायत मैदान, स्व.राजीव गांधी मार्ग टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे.
वर्धापन दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, तथा शासकीय अधिकारी, विविध संस्था, शासकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.