नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा शहरा नजीक श्रावणी गावाजवळ डोगेगाव खांडबारा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.
अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकी चक्काचूर झाल्या आहे, तर वडदा येथील एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. तर दुसऱ्या स्प्लेंडर मोटर सायकल वरील दोघेजणही गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन गेल्याचे समजते.
या भीषण अपघातात वडदा येथील मोतीलाल कोकणी हा जागीच ठार झाला आहे. तर आत्माराम कोकणी रा. वडदा व रवींद्र नाईक नगारे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
अपघातामध्ये दोन्ही मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच खांडबारा पोलीस दूरक्षेत्र येथील पोलीस हवालदार सुरेश मोरे, भूषण चित्ते, व होमगार्ड अजय कोकणी, गणेश कोकणी, सोमनाथ कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.