नंदुरबार l प्रतिनिधी
काकर्दे ता.नंदुरबार येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रा दि. २५एप्रिल २०२३ मंगळवारी भरणार आहे. खंडेराव महाराज यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच पुंडलिक भापकर यांनी दिली. १९९० साली खंडेराव महाराजाच्या मंदिराचा जिर्णोद्धार लोकवणीतून करण्यात आला .
दीडशे वर्षापासून श्री खंडेराव महाराज यात्रा काकर्दे येथे भरते, यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या तिसरी पिढीतील श्री.खंडेराव महाराज यांचे सेवेकरी प्रकाश आनंद माळी हे बारा गाडे ओढणार(लांगड)आहेत .झगा माळी यांनी बारा गाडी ओढण्यास सुरुवात केली त्यानंतर बन्सीलाल झगा माळी तीन वर्षापासून प्रकाश माळी हे बारागाडी ओढतात प्रसिद्ध श्री खंडेराव महाराज यात्रे साठी पंचक्रोशीतील तसेच दुरवरच्या ठिकाणाहून मल्हारी मार्तंड भक्त येत असतात.
खंडेराव महाराज मंदिराला रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य मंदिराला आकर्षक पध्दतीने सजावट केली केली जात आहे. नातेसंबंधातील नातेवाईकाचे गावात आगमन होत आहे. यात्रेनिमित्त ग्रामस्थांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण दिसून येत आहे.








