नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलच्या व्यापारी मतदारसंघातील उमेदवार रवी कोठारी आणि गिरीश अग्रवाल यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चांगली चुरस पाण्यात मिळत असून भाजपाच्या वतीने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्यात आला असून बाजार समिती काबीज करण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली खा. डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनात भाजप पुरस्कृत पॅनलच्या प्रचाराला सुरुवात झाली असून
भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे नंदुरबार बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण असून त्यात भाजपाच्या हाती सत्ता सोपवल्यास पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.
बाजार समितीच्या प्रचारात भाजपाची आघाडी बाजार समिती काबीज करण्याचा निर्धार निवडणूक प्रचाराला वेग भाजपा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा संपन्न राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित संसद रत्न खा. हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, किशोरभाई वाणी, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, निंबा माळी, लक्ष्मण माळी, आनंद माळी, रवी कोठारी, गिरीश अग्रवाल हे उपस्थित होते.








