नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा आज रोजी नवापुर तालुक्यातील धनराट येथील आई हिंदळा मातेच्या मंदिरात नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष तथा डोकारे आदिवासी सह.साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांच्या हस्ते विधिवत पूजन करून नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी आ. शरद गावित, परिवर्तन पॅनलचे उमेदवार गिरीष ( नंदुभाऊ ) गावित, वासुदेव कोकणी, शिवदास कोकणी, दिनकर गावित, दिलीप गावित, रमेश गावित, संदीप गावित,विष्णू गावित, हरिश्चंद्र पाडवी, अर्जुन कुंभार, सुनील वसावे, भालचंद्र गावित, लखन अग्रवाल, श्रीमती सुमित्रा कोकणी,श्रीमती विलांती ठिंगळे, श्रीमती अमिता वसावे, श्रीमती रमिला गावित,तसेच देवराम गावित, दिगंबर गावित, कुणाल गावित, सिद्धांत गावित, जयवंत जाधव, सुनील गावित आदींसह मंदिराचे पुजारी व धनराट ग्रामस्थ उपस्थित होते.








