नंदुरबार l प्रतिनिधी
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या पुरवठा कमी असल्याने जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन माजी आ चंद्रकांत रघुवंशी यांनी रक्तदान शिबिराप्रसंगी केले .
मानवतेचे मसीहा बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ संपूर्ण निरंकारी जगतात देश विदेशामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भारतवर्षांतील मिशनच्या बहुसंख्य शाखांसह मिशनचे मुख्यालय असलेल्या राजधानी दिल्लीमध्ये देखील महा रक्तदान अभियान राबविण्यात येत आले. त्यामध्ये मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे रक्तदान केले..
याचाच एक भाग म्हणून धुळे झोन ३६-बी अंतर्गत नंदुरबार शाखा येथे संत निरंकारी सत्संग भवन सिंधी काँलनी याठिकाणी भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . या शिबिरात एकुण ७३ रक्तयुनिट संकलन करण्यात आले. त्यात ६२पुरुष ११ महिलांच्या समावेश होता. मंडळातर्फे गेल्या ११ वर्षांपासून रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे त्यात आतापर्यंत १३०० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन माजी आ चंद्रकांत रघुवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. संत निरंकारी मंडळाचे शिरपूर शाखेचे मुखी गणेश पाटील उपस्थित होते. पुंडलिक निकुंभे मुखी, शहादा शाखेचे मुखी मोहन आहुजा, माजी नगरसेवक शत्रुघ्न बालानी, रवींद्र पवार ,दीपक दिघे ,अतुल पाटील, राजकुमार तेजवानी आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.. या महा शिबीराच्या आयोजन नियोजनासाठी सेवादल अधिकारी सुनील बागुल, संतोष चव्हाण,शंकर हासाणी यांच्या सह सेवादल सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले








