नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे ग्रामपंचायत काकर्दे व्दारा वाचन कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, व रूजवण्यासाठी, ग्रामपंचायत काकर्दे व्दारा तसेच युवकांनी ह्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. स्व.जेष्ठ पत्रकार रविंद्र चव्हाण तसेच स्व अरविंद माळी यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत काकर्दे व्दारा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाचन कट्टा फलकाचे उद्घाटन संरपंच पुंडलिक भापकर,व उपसंरपंच किरन मराठे, माजी सरपंच रविंद्र बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल ठाकरे व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्ञानेश्वर बागुल, विठोबा माळी, राकेश माळी,भटु माळी, जितेंद्र भंवर, संजय माळी,देविदास माळी, अंकुश जगदेव, सोपानदेव चव्हाण,भावराव माळी, खंडू मराठे, भरत खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा सामाजिक उपक्रम असून विविध विषयांवरील पुस्तके तसेच विविध वर्तमान पत्रे या वाचन कट्ट्यावर ग्रामपंचायत काकर्दे व्दारा प्रत्येक दिवशी उपलब्ध करून देण्यात येतील याची माहिती ग्रामसेवक शरद गायकवाड यांनी या वेळी उपस्थित नागरिकांना करुन दिली. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रामपंचायत काकर्दे ने अवलंबिलेल्या या वाचन कट्ट्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.








