नंदुरबार l प्रतिनिधी
अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं सत्कर्म, दानाने पुण्य लाभत असतं. सत्कर्म करणारे पुढे जात असतील तर तुम्ही देखील त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवा म्हणजे तुम्हाला देखील त्याचे पुण्य लाभ होईल त्यामुळे नेहमी सत्कर्म करण्याच्या नेहमी प्रयत्न करा असा सल्ला शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवभक्तांना दिला.
नंदुरबार शहरालगत असलेल्या शहादा बायपास रस्त्यावर २५ कोटी खर्चाचे १२५ बेडचे उद्घाटन आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते करण्यात त्यानंतर हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या त्यांचा संगीतमय शिव चर्चेचे निरूपण त्यांनी केले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून रोहयो मंत्री संदिपान भुमरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.यावेळी माजी ॲडिशनल सॉलिसिटर राजेंद्र रघुवंशी,अनिता रघुवंशी, माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, डॉ. मनोहरसिंग रघुवंशी,अर्चना रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मेघा रघुवंशी, छत्रपती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.तुषार रघुवंशी,शिल्पा रघुवंशी, साहिल प्रधान,अमृता प्रधान, विवेक प्रधान, कंचन प्रधान, कल्याणी रघुवंशी, अजय रघुवंशी,माजी नगरसेवक किरण रघुवंशी,राधिका रघुवंशी,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी कल्याणी रघुवंशी,पृथ्वी रघुवंशी, थिया रघुवंशी आदी उपस्थित होते.
कथेचे निरूपण करतांना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले,देवराज पुण्यात्री नव्हता परंतु, त्याची माता शिवलिंगावर पाणी अर्पण करत होती. त्यामुळे त्याचे पुण्य त्याला मिळालं होत. ज्याचा पैसा सत मार्गावर जात नाही तो पैसा दारू, अनैतिक मार्गाकडे वळायला सुरुवात करतो.पुराणातील चंचुली देवीचा दाखला देत पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले की, मौन धारण करणे एक आभूषण असून, चंचु देवी नेहमी मौनात राहायची त्यावेळेस माता पार्वतीने तिला सांगितले तू, कैलासावर राहते. या ठिकाणी नामस्मरण करायला पाहिजे. तुझ्या मौनाचे कारण विचारले असता चंचूला देवी म्हणाली माझा पती प्रेत योनीत गेला आहे. त्याला मुक्ती नाहीय मिळत आहे. त्यावर पार्वती माता ने शिव भक्ती करणाऱ्या तुमरूका कडे जाण्याच्या सल्ला दिला त्यानंतर चंचुला देवीचा पतीला मोक्ष मिळाला
शिवधाम उद्यान साकारणार
यावेळी माजी आमदार चंद्रकांत म्हणाले,शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत शिवधाम उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी याकामासाठी १ कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. यांच्या हस्ते उद्घाटन; शिव चर्चेत लाखांवर भाविकांची उपस्थिती








