नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला असू. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून नदीला मोठा पूर आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याचे अंदाज आहे.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तळोदा तालुक्यातील रामपूर परिसरात जोरदार वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रामपूर आणि परिसरात जोरदार अवकाळी पाऊस बरसला असून गारपीटही झाल्याने केळी पपई तसेच इतर फळबागा आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तसेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून नदीला मोठा पूर आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याचे अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.








