नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरातील आंबेडकर चौकात इलेक्ट्रिक मोटार सकाळी काढून देतो असे सांगितल्याच्या रागातून पाच जणांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा शहरातील आंबेडकर चौकातील अशोक छोटूु अहिरे यांच्याकडे भूपेंद्र पुडलिक तजवित यांनी त्यांची इलेक्ट्रिक मोटार मागितले. यावर अशोक अहिरे यांनी भूपेंद्र तजविज यांना सदर इलेक्ट्रिक मोटार ही कलर मारण्याच्या मशिनला जोडलेली असून ती खोलून सकाळी देतो, असे सांगितले.
याचा राग आल्याने अशोक अहिरे यांना भूपेंद्र तजविज याने काठीने डोक्यावर, पाठीवर व पायावर मारुन दुखापत केली. यावेळी अशोक अहिरे यांचे भाऊ संभू अहिरे, वहिणी शोभा अहिरे व त्यांच्या मुली नेहा व राधा भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही जितू पुंडलिक तिजविज व ललीता भूपेंद्र तिजविज यांनी शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी देत हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत अशोक अहिरे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुधीर गायकवाड करीत आहेत.








