Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा महाविद्यालयात आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर व्याख्यानासह प्रदर्शन

team by team
April 1, 2023
in राज्य
0
शहादा महाविद्यालयात आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर व्याख्यानासह प्रदर्शन
शहादा l प्रतिनिधी
     आदिवासी क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विषयावर पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व्याख्यान व प्रदर्शन संपन्न झाले.
    शहादा येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय जनजाति आयोग नई दिल्ली,कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.28 मार्च 2023 रोजी महात्मा गांधी सभागृह येथे आदिवासी क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर व्याख्यान व प्रदर्शनी आयोजित करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून जितेंद्र महाजन उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस.पाटील हे होते.व्याख्यान व प्रदर्शनासाठी प्रा.खुमानसिंग वळवी  यांच्या समन्वयाने शहादा तालुक्यातील सर्व  महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास व प्रदर्शनासाठी शहादा तालुका सहकारी संस्थेचे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय शहादा, सोनामाई महिला महाविद्यालय शहादा, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, शिक्षणशास्त्र महाविद्यालय शहादा, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा या सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
व्याख्यानासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व राष्ट्रीय जनजाती आयोगाचे समन्वयक जितेंद्र महाजन यांनी आदिवासी क्रांतिकारकांची स्वातंत्र्य लढ्यामधील योगदान व त्यांचा गौरवशाली स्वातंत्र्याचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच त्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचा दुर्लक्षित केल्या गेलेला व मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला इतिहास परत लिहिण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व्याख्यानाचा समारोप करत क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्थान व स्फूर्ती स्थान आहेत असे नमूद केले. व्याख्यानानंतर सहभागी महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी विकास अधिकारी व शहादा तालुक्यातील सर्व विद्यार्थी यांनी आदिवासी क्रांतिकारकांची माहिती पोस्टरवर लावण्यात आलेली प्रदर्शनी बघितली. या आयोजनासाठी विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. खुमानसिंग वळवी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.डॉ.प्रशांत तोरवणे यांची उमविच्या भूगोल अभ्यास मंडळावर सदस्यपदी निवड

Next Post

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात शहादा एनसीसी कॅडेटस्चा सहभाग

Next Post
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात शहादा एनसीसी कॅडेटस्चा सहभाग

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात शहादा एनसीसी कॅडेटस्चा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add