म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडीयम स्कुल आमलाड येथे वार्षिक पारितोषिक वितरण चा कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी ललित पाठक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्या किरण वळवी हे होते तर शिक्षक किरण वसावे,संजय मोरे,प्रिती बुनकर,सारिखा मराठे हे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून करण्यात आले यानंतर शैक्षणीक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध स्पर्धा व परीक्षा मध्ये उर्तीर्ण झालेल्या स्पर्धामघून प्रथम तीन विजेते काढण्यात आले होते अशा यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी,मेडल व शैक्षणीक साहित्य उपस्थित प्रमूख पाहुण्यांचे हस्ते वाटप करण्यात आले.आतापर्यंत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले यावेळी सर्वं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन शिक्षिका गौरी सूर्यवंशी यांनी केले तर आभार रंजना शिंदे यांनी केले.