तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे पंचायत समितीच्या सभापती तसेच उपसभापतीच्या दालनात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .त्यात प्रामुख्याने शबरी घरकुल प्रस्तावाच्या फाईलला त्रूटी म्हणून १०० रु. स्टॅम्प पेपरमध्ये माहिती मागितली आहे ती १०० रु स्टॅम्प न वापरता स्वयं घोषणपत्रच द्यावे असे आदिवासी विकास विभागच्या कर्मचारी यांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसापासून ग्रामीण भागातील शबरी घरकुल लाभार्थी हे स्टॅम्प बाकी म्हणून पंचायत समितीमध्ये यासंदर्भात विचारपूस करत होते. त्या सर्वांची प्रत्यक्षात माहिती पंचायत समितीच्या बैठकीत मागविण्यात आली असता स्टॅम्पच घ्यावा असे कोणतेही वरीष्ठ कार्यालयाचे पत्र नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी म्हटले.
या स्टॅम्प मुळे सामान्य लाभार्थी यांची आर्थिक बाजू लक्ष्यात घेता खूप मोठा फटका बसत होता.कारण लाभार्थी हे दिवसाची मोलमजुरी बुडवून, तसेच तसेच तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा प्रवास खर्च व इतर खर्च असा बराच आर्थिक भुर्दंड सामान्य लाभार्थी यांना बसत असल्याची कैफियत सर्व सदस्य यांनी या ठिकाणी मांडली तसेच त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाचे पत्र किंवा टिप्पणी विचारल्यावर ते तोंडी स्वरूपात असल्याचे जाणवले.
त्यानंतर स्वयं घोषणा पत्र कायदा रद्द झाला का? त्या अंतर्गत काय सुविधा आहेत असा प्रश्न सदस्य दाज्या पावरा यांनी उपस्थित केल्यावर आम्ही १०० रु स्टॅम्प मागीतले नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे यापुढे स्टँप न देण्याचे सर्वानुमते ठरले.
यावेळी या सभेला सभापती लताबाई वळवी,उपसभापती विजय राणा,सदस्य दाज्या पावरा,सुमनताई प्रधान,यशवंत ठाकरे,विक्रम पाडवी,चंदन पवार,लिलाबाई पवार,सुपिबाई ठाकरे तसेच,गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, विस्तार अधिकारी बी.के.पाडवी व विभाग प्रमुख उपस्थित होते.









