नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ देवनार ठाणे हिल्स, कॉव्हेंटरी फोनिक्स आणि नंदनगरी, डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार व नंदुरबार जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या विद्यमाने शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मोफत अस्थिव्यंग (दिव्यांग) सुधारक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा अस्थिव्यंग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दि. 1 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता मोफत अस्थिव्यंग (दिव्यांग) सुधारक शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी आ.शिरीष चौधरी, भाजपाचे प्रदेश महामंत्री तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, मुंबईचे डॉ.मयुरेश वारके, डॉ.प्रमोद काळे, जिल्हा रुग्णालयातील सर्जन डॉ.राजेश वसावे, महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे उपाध्यक्ष विनय श्रॉफ आदी उपस्थित राहणार आहेत.
मोफत अस्थिव्यंग (दिव्यांग) सुधारक शस्त्रक्रिया शिबिरासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य संतोष वसईकर, स्मित हॉस्पिटलचे संयोजक निलेश तवर यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ. नितीन पंचभाई, नंदुरबार जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले आहे.