नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर पोलिस ठाण्यात फरहान अब्दुल शेख (रा.जुनी पोस्ट गल्ली, नवापूर) याला पोलिस शासकीय कर्तव्यात असतांना पोलिस कॅबिन बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने फरहान अब्दुल शेख याने तुम्ही मला बोलू नका, मी येथून जाणार नाही, असे मोठमोठ्याने बोलून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याबाबत पोशि.दादाभाऊ लोटन वाघ यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात फरहान अब्दुल शेख याच्याविरोधात भादंवि कलम १८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.








