नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील नांदर्डे-प्रकाशा शिवारात ट्रॅक्टर ट्रॉलीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन येथील नज्या देवजी पाडवी हे दुचाकीने (क्र.जी.जे.१६ सीके ०५०१) प्रकाशाकडे जात होते. यावेळी वासुदेव भाऊभाई पाटील याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर टॉलीमध्ये ( क्र.एम.एच.३९ एएफ १९६९) ऊस भरुन प्रकाशाकडून तऱ्हावदकडे जात असतांना ट्रॅक्टरची मागील ट्रॉलीने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात नज्या पाडवी यांना दुखापत झाली.
याबाबत नज्या पाडवी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक वासुदेव पाटील याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मेहेरसिंग वळवी करीत आहेत.








