Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खासदार डॉ.हीना गावित सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित, प्राईम पाईन्ट फाऊंडेशनतर्फे दिल्लीत गौरव

team by team
March 25, 2023
in राजकीय
0
खासदार डॉ.हीना गावित सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित, प्राईम पाईन्ट फाऊंडेशनतर्फे दिल्लीत गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी

लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना विजयकुमार गावित यांना काल प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्यावतीने नवी दिल्ली येथे हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. खा.डॉ.हीना गावितांच्या नऊ वर्षाच्या कालावधीत त्यांच्या संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग सातव्यांदा त्यांना संसदरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्यावतीने सदर पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते.यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय, संसदरत्न पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, खा.श्रीरंगअप्पा बारणे, के.श्रीनिवासन, ॲड.प्रियदर्शनी राहूल आदींच्या उपस्थितीत खा.डॉ.हीना गावित यांना सदर पुरस्काराने सन्मान्नित करण्यात आले.

खा.डॉ.हीना गावित या सन २०१४ मध्ये प्रथमच खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे कामकाज, संसदेत मतदार संघातील विविध प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी केलेला पाठपुरावा, मतदार संघातील विकासकामे, संघटन कौशल्य, प्रभावी वक्ता आदी गुणांच्या बळावर सातव्यांदा त्यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.दरम्यान,सन २०१४ ते २०१९ या कालावधीत संसदेत केलेल्या भाषणांचे ई-पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्यात करण्यात आले.

गेल्या दोन पंचवार्षिकपासून संसदेमध्ये नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. नागरिकांच्या विश्वासामुळे मी मतदार संघातील विविध समस्या प्रभावीपणे सोडवू शकली आहे. राजकीय गुरु डॉ.विजयकुमार गावित, परिवाराचे पाठबळ व जनतेचा विश्वास या बळावर आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार. आज सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आल्याने मी भावनिक झाली आहे.
– खा.डॉ.हीना गावित
(नंदुरबार लोकसभा मतदारसंघ)

बातमी शेअर करा
Previous Post

काळंबा फाट्यानजीक दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात, पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी ठार

Next Post

नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास अधिकार्‍यांवर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करणार : भाजपा नेते डॉ.विक्रांत मोरे यांचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add