नाशिक | प्रतिनिधी
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. मतपत्रिकांची छाननी करून वेगवेगळे गठ्ठे करत २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे.दुसऱ्या फेरी अंती सत्यजित तांबे तब्बल साडे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्याउमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असून दुसऱ्या फेरी अंती सत्यजित तांबे तब्बल साडे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत
मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.दुसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना ३१ हजार ९ मते मिळाली.
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
➡️ वैध मते – 50555
➡️ अवैध मते – 544531
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 31009
➡️ शुभांगी भास्कर पाटील : 16316
➡️ रतन कचरु बनसोडे : 1157
➡️ सुरेश भिमराव पवार : 360
➡️ अनिल शांताराम तेजा : 46
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100
➡️ अविनाश महादू माळी : 623
➡️ इरफान मो इसहाक : 28
➡️ ईश्वर उखा पाटील : 89
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 103
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104
➡️ नितीन नारायण सरोदे : 129
➡️ पोपट सिताराम बनकर : 37
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे : 83
➡️ संजय एकनाथ माळी : 76








