नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा व मोलगी येथे वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघा वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील आमलाड येथील सचिन कृष्णा पाडवी याने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.जी.जी. २ वायवाय ६७२१) तळोदा शहरातील बस स्थानक परिसरातील रस्त्यावर लावून वाहतूकीत अडथळा निर्माण केला.
तसेच अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा येथील विशाल धर्मा पाडवी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (क्र.एम.एच.१८ एस ००८०) मोलगी गावातील बैल बाजारातील रस्त्यावर लावून वाहतूकीस अडथळा निर्माण केला. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात दोघा वाहन चालकांविरोधात भादंवि कलम २८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








