नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे कौटूंबिक कारणावरुन सासूला मारहाण केल्याप्रकरणी सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील भवरीदेवी बाबुलालजी शर्मा यांना कौटूंबिक कारणावरुन सून कविता शर्मा हिने दगडाने पाठीवर, डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली. तसेच कविता शर्मा व एक अनोळखी इसम यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली.
याबाबत भवरीदेवी शर्मा यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात कविता शर्मा व एका अनोळखी इसमाविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गोविंद जाधव करीत आहेत.








