नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील साई प्लाझा येथे गावठी पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील बस स्थानकाजवळ दीपक मनोजभाई यादव हा त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस बाळगतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व ६०० रुपये किंमतीचे काडतुस असा १५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोशि.विशाल मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दीपक यादव याच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/५ चे उल्लंघान २५ प्रब्मााणे महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहेत.








