नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा- शहादा तालुक्यातील शेत शिवाराशी जोडल्या जाणाऱ्या ५९ गावातील प्रत्येकी १ किलोमीटर लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना आ. राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत शिवारात जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. आ.पाडवी यांनी शेतकऱ्यांची मोठी समस्या दूर केल्याने शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेत शिवारात जाण्यासाठी रस्त्या अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात पक्के रस्ते नसल्याने ठीक ठिकाणी पाणी साचून शेतापर्यंत पोहोचणेही अशक्यप्राय होते. ऊस, केळी, पपई यासारख्या पिकांच्या काढणीनंतर रस्तेचं नसल्याने ट्रॅक्टर, ट्रक यासारखी मोठी वाहने शेतापर्यंत जाऊ शकत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा बिकट परिस्थितीच्या सामना करत शेतीमाल काढावा लागतो. कधी कधी स्वखर्चाने शेतकरी तात्पुरता रस्ताही तयार करतात परंतु कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सुटत नाही.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतून तळोदा शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याच्या लाभ मिळावा, यासाठी आ. राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे मागणी केली होती. अखेर आ.राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहादा तळोदा तालुक्यातील ५९ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
यात तळोदा तालुक्यातील धानोरा, मोड, खरवड, चिनोदा- रांझणी दसवड, तळवे, नर्मदानगर, सिलिंगपूर, बोरद,राणीपूर, दसवड, कडेल, खेडले तर शहादा तालुक्यातील कमरावत, कानडी (त.ह.) ,दामळदा, आमोदा, भूलाने, रायखेड, पाडळदा, अलखेड, तिखोरा, उंटावद, होळ, आवगे, पिंपरी, तितरी, मलगाव, सुलवाडे, डोंगरगाव, मंदाणे, असलोद डाबरदागर टू की भुलवाडे म्हसावद, कोचरा, जुना रामपूर ,कुडावद, गोगापूर, मोहिदा, ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, गोगापूर- देवपूर नर्मदा व वडगाव अशा एकूण ५९ गावांच्या रस्ते कामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांच्या शेतशिवरातील रस्त्यांच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने तळोदा शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आ. राजेश पाडवी यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.








